भारतीय नागरिकत्व स्वीकारलेल्या पाकिस्तानी अल्पसंख्य समाजातील डॉक्टरांना ‘प्रॅक्टिस’ करण्याची अनुमती

प्रतीकात्मक छायाचित्र

नवी देहली – भारताच्या ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने पाकमध्ये छळ करण्यात आल्यामुळे भारतात आश्रय घेऊन भारतीय नागरिकत्व स्वीकारलेल्या हिंदु, शीख आणि अन्य अल्पसंख्य समाजातील डॉक्टरांना भारतात ‘प्रॅक्टिस’ करण्याची अनुमती दिली आहे. ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या पाकिस्तानी अल्पसंख्यांकांना याचा लाभ मिळणार आहे. यासाठी आता ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने अ‍ॅलोपॅथीचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेल्या कायमस्वरूपी नोंदणीसाठी भारतीय नागरिकत्व स्वीकारलेल्या लोकांकडून अर्ज मागवले आहेत.