भारतद्वेषी सैन्याधिकार्यासह ६ अधिकारी ठार !
इस्लामाबाद (पाकिस्तानी) – पाकिस्तानी सैन्याचे एक हेलिकॉप्टर १ ऑगस्टच्या सायंकाळी बेपत्ता झाले होते. दुसर्या दिवशी ते बलुचिस्तानमध्ये कोसळल्याचे समोर आले. यातील पाकच्या सैन्याचे ६ अधिकारी ठार झाले. यामध्ये पाकच्या क्वेटा येथील १२ व्या कोरचे कमांडर लेफ्टिनेंट जनरल सरफराज अली यांचाही समावेश आहे. ते भारतद्वेषी होते. हे हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्या ‘बलुच राज आजोई संग’ या संघटनेने ‘द बलुचिस्तान पोस्ट’ या वृत्तसंकेतस्थळावर केला आहे.
Baloch freedom fighters claim responsibility for Pakistan Army helicopter crash, say military is lying by calling it ‘accident due to bad weather’https://t.co/GTBBJ6c6RV
— OpIndia.com (@OpIndia_com) August 3, 2022
या घटनेमागे अल् कायदा आणि बलुच संघटना यांचा हात असल्याचे म्हटले जात आहे. एक दिवस आधी अमेरिकेने अल् कायदाचा प्रमुख अल्-जवाहिरी याला ठार मारले हेते. त्यासाठी पाकने अमेरिकेला साहाय्य केल्याचे म्हटले जात आहे. यामुळेच अल् कायदाने सूड उगवण्यासाठी पाक सैन्याच्या अधिकार्यांचे हेलिकॉप्टर पाडल्याचे म्हटले जात आहे.