पाटलीपुत्र (बिहार) – बिहारच्या कटिहारसमवेत अन्य शहरांतील अनेक शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारी सुटी दिली जात असल्यावरून केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, शुक्रवारी शाळांना सुटी घोषित करण्याच्या माध्यमातून शरीया कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लहानपणापासून आपण जाणतो की, शाळा आणि कार्यालये रविवारीच बंद असतात. त्यामुळे शुक्रवारी सुटी देणे, हा एका समुदायाच्या लाभासाठी शरीया लागू करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वाटते.
बिहार के उर्दू स्कूलों में शुक्रवार की छुट्टी पर बवाल; गिरिराज सिंह ने दिया बड़ा बयानhttps://t.co/HcveganT6M
— Zee Salaam (@zeesalaamtweet) July 30, 2022
संपादकीय भूमिकाअशा प्रकारे हिंदूंच्या उपासनेच्या दिवशी एखाद्या शाळेने सुटी दिली असती, तर एव्हाना त्या शाळेला कट्टरतावादी ठरवले गेले असते ! ‘शिक्षणाचे भगवेकरण’ म्हणून हिणवले गेले असते ! आता येथे उघडपणे सरकारी शिक्षणाचे हिरवेकरण केले जात असतांना तथाकथित धर्मनिरपेक्षतावाले मूग गिळून गप्प आहेत ! |