उदयपूर येथील २ हिंदु व्यापार्‍यांना कन्हैयालाल यांच्याप्रमाणे हत्या करण्याची धर्मांधाची धमकी

प्रतीकात्मक छायाचित्र

उदयपूर (राजस्थान) – येथे काही दिवसांपूर्वी कन्हैयालाल यांची शिरच्छेद करून हत्या केल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात अन्य दोन हिंदु व्यापार्‍यांना दूरभाष करून हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. इराणमधून ही धमकी देण्यात आल्याची प्राथामिक माहिती आहे. या धमकीनंतर पोलिसांनी दोघाही व्यापार्‍यांच्या दुकानांना संरक्षण पुरवले आहे. या व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, त्यांनी कधीच नूपुर शर्मा यांचे समर्थन केलेले नाही.

कन्हैयालाल यांचे जेथे दुकान होते, त्याच धानमंडीमध्ये या व्यापार्‍यांची दुकाने आहेत. हीरालाल डांगी या व्यापार्‍याला ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे , तर केशकर्तनालय असणार्‍या एकालाही ‘व्हॉट्स अ‍ॅप’द्वारे धमकी देण्यात आली आहे.

व्यापारी नितीन जैन यांची माहिती काढणार्‍या तिघा धर्मांधांना अटक !

उदयपूर येथील व्यापारी नितीन जैन यांनीही नूपुर शर्मा यांचे समर्थन केले होते. त्यांनाही ठार मारण्याची धमकी मिळाली होती. त्यांच्या दुकानाची काही धर्मांधांनी माहिती काढली होती. पोलिसांनी त्यातील शाहिद नवाज, अब्दुल मुतलिब आणि गुरफान हुसेन यांना अटक केली आहे.

सूरतमध्ये व्यापार्‍याला धमकी देणारे तिघे धर्मांध अटकेत !

सूरतमधील विशाल पटेल या व्यापार्‍याला नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्यावरून ठार मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद नईम आतिशबाजीवाला, महंमद रफीक भूरा आणि आलिया महंमद यांना अटक केली आहे, तर मुना मलिक, शहजाद कटपीसवाला आणि फैझान हे पसार आहेत. विशाल पटेल यांनी शर्मा यांचे समर्थन केल्यावरून क्षमाही मागितली होती, तरीही त्यांना धमक्या देण्यात येत होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

संपादकीय भूमिका

राजस्थानमधील काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करत असल्याने धर्मांध मोकाट सुटले असून ते अशा प्रकारे हिंदूंना धमक्या देत आहेत, असेच यातून दिसून येते !