असंसदीय शब्दाविषयी नेमके आदेश पडताळून पाहू ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

नागपूर – लोकसभा आणि राज्यसभा येथे होणार्‍या चर्चेत कोणत्याही शब्दांवर बंदी घालण्यात आलेली नाही, असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे याविषयी नेमकी परिस्थिती आणि आदेश पाहून निर्णय घेऊ, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ जुलै या दिवशी पत्रकारांशी बोलतांना येथे केले.

१८ जुलैपासून चालू होणार्‍या संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाने अनेक शब्द असंसदीय ठरवले आहेत. त्यावरून देशात गदारोळ उडाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. औरंगाबादसह इतर शहरांच्या नामांतराचा निर्णय शिंदे-भाजप सरकारने स्थगित केला आहे. यावर ‘हा राज्य सरकारचा प्रश्न आहे’, असे सांगत शरद पवार यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.