सर्व साधकांचा आधार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या वेळी झालेला रथोत्सव पाहून सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे) यांना सुचलेले काव्यपुष्प येथे दिले आहे.
आला गं आला, श्रीहरि (टीप १) हा आला ।
पहा ना आला, श्रीपति हा आला ।। धृ. ।।
जन्मदिनाचा क्षण हा उचित ।
देवभेटीला भक्त तृषार्त (टीप २) ।
जाणूनी सर्वांतरीचे हृद्गत ।
सप्तवारूंच्या बसूनी रथात ।
आला धावत धावत ।। १ ।।
अगणित लावण्य दिव्य तेज कांती ।
कमल मुखावर सहस्र चंद्र – सूर्य दिप्ती ।
नेत्रांतून वाहे गंगौघ (टीप ३) प्रीती ।
अवचित प्रत्यक्ष पाहूनी हरीला ।
भावभक्तीचा बंधारा फुटला ।। २ ।।
श्रीहरि सोबत भामा रुक्मिणी ।
संध्या-छायासहित दिनमणि (टीप ४) ।
श्रीविष्णुसह पद्मिनी-लक्ष्मी ।
सप्तर्षि सांगती कौतुकाने ।
कलियुगी श्रीविष्णु ‘श्री श्री जयंत’ रूपात अवतरला ।। ३ ।।
भक्त, संत अन् साधक यांची दिंडी मनोहर ।
पालखीत बसले रामशिळा शाळिग्राम ।
नृत्य, गायन, भजनासंगे चालला हरिनामाचा गजर ।
भक्तांची भावभक्ती पाहूनी ।
श्रीहरिही भावविभोर झाला ।। ४ ।।
रामनाथीच्या सगुण श्रीहरीचा दिव्य रथोत्सव ।
कुणी न पाहिला, कुणी न ऐकला असा महोत्सव ।
सप्तलोक अन् त्रिभुवन धावे बघण्या उत्सव ।
कलियुगातही देव किती व्याकुळला ।
भक्तभेटीला स्वयं श्रीहरि हा आला ।। ५ ।।
आला गं आला, श्रीहरि धावत बघ आला ।
पहा ना, भक्तांसाठी हा आला ।। ६ ।।
टीप १ – परात्पर गुरु डॉ. आठवले
टीप २ – तहानलेला
टीप ३ – गंगेचा ओघ
टीप ४ – सूर्य
– सौ. शालिनी प्रकाश मराठे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |