सख्यभाव

‘सख्य म्हणजे मैत्री. सख्यभाव म्हणजे ‘भगवंतच आपला सखा आहे, मित्र आहे’, अशी भावना निर्माण होणे. भक्ताला विश्वास असतो की, त्याची सर्व गुपिते त्याच्याजवळ सुरक्षित रहातील आणि वेळप्रसंगी साहाय्यही मिळेल. ‘आपल्या जिवलगाने आपली कानउघडणी केली, तरी त्यामागची कळकळीची भावना आपण समजू शकतो’, तसेच हे आहे. विशुद्ध मनाखेरीज सख्यभाव शक्य नाही. कुणी कुणाला समजून घ्यावे लागत नाही. दोघे एकमेकाला समजतातच. दोघांच्या मनामध्ये माहीत नसलेले गुपित नसतेच मुळी. अशा रितीने मनाने एकरूप होणे म्हणजे सख्य भक्ती. यात भगवंताविषयी असलेला आपला विश्वास, प्रेम, तळमळ सगळे वाढतच जाते  आणि भगवंतही खऱ्या भक्ताला कधी निराश करत नाही ! असा हा सख्य भक्तीचा महिमा !’

– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.