ठाणे येथे संरक्षकभिंती कोसळल्या !

ठाणे, ५ जुलै (वार्ता.) – पावसामुळे ठाणे शहरात काही भागांत वृक्ष उन्मळून पडले. घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन एस्.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. शहरातील वंदना एस्.टी. विभागीय कार्यालयाची संरक्षकभिंती २ घरांवर कोसळून एकजण घायाळ झाला. मुंब्रा भागातील एका चाळीची सुरक्षाभिंत कोसळली.

भिवंडी येथे नाले आणि गटार यांतील पाणी रस्त्यावर आले आहे. विविध ठिकाणची वाहतूकव्यवस्था कोलमडली. कल्याण येथे आडीवली ढोकली परिसरातील ४०० घरे पाण्याखाली गेली.