परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती’ या साधनेच्या पाच टप्प्यांतून साधना करवून घेतल्याने आध्यात्मिक प्रगती झाल्याचे अनुभवणारे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक वैद्य प्रकाश घाळी (वय ७३ वर्षे) !

२७.३.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आलेल्या चौकटीत ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कोणत्या शिकवणीमुळे आध्यात्मिक प्रगती झाली ?’, या संदर्भातील लिखाण देण्यास सांगितले होते. त्या संदर्भात माझे अनुभव पुढे दिले आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रारंभी नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती या ५ गोष्टी शिकवल्या. ‘या ५ टप्प्यांच्या माध्यमातून माझी प्रगती कोणत्या टप्प्याने अधिक झाली ?’, हे सांगणे मला कठीण आहे.

डॉ. प्रकाश घाळी

१. नाम

मी १९९७ या वर्षी साधनेला आरंभ केला. मी प्रारंभी सत्संगात सांगितल्याप्रमाणे कुलदेवाचे नामस्मरण करत होतो. मला कुलदेवाच्या नामस्मरणाचा पुष्कळ उपयोग झाला. माझा कुलदेव खंडोबा आहे. कुलदेवाने मला अनेक अनुभूती देऊन पुढचे मार्ग दाखवले. एखादे वडील आपल्या बाळाला जसे हात धरून चालायला शिकवतात, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला साधनामार्गावर चालायला शिकवले. यावरून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रारंभी कुलदेवाचे नामस्मरण करायला सांगितले होते, ते अतिशय योग्यच होते’, हे माझ्या लक्षात आले.

२. सत्संग

मी सत्संगाला जाऊ लागल्यावर ‘सत्संगाच्या चैतन्याचा लाभ होतो’, हे मी अनुभवले. यामुळे मला सत्संगाची ओढ लागली.

३. सत्सेवा

सत्संगामुळे मला सेवेची संधी मिळाली. ‘सेवेमध्ये लागणारी शक्ती ईश्वरच देतो’, हे मी अनुभवले.

४. त्याग

सेवेच्या माध्यमातून माझा त्यागही झाला. मी अर्पण केलेले पैसे ईश्वर माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून मला परत देत होता.

५. प्रीती

हे सर्व करता करता मला इतरांविषयी प्रेम (प्रीती) निर्माण झाले. मला अधून-मधून आनंद मिळू लागला.

‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग आणि प्रीती या शिकवणीमुळे आध्यात्मिक उन्नती शीघ्र गतीने होते’, हे मी अनुभवले.

(‘काळानुसार आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जलद आध्यात्मिक प्रगतीसाठी अष्टांग साधनेचे पुढील ८ टप्पे संगितले आहेत. ‘१. स्वभावदोष-निर्मूलन, २. अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. भक्तीभाव जागृत करण्यासाठी करायचे प्रयत्न, ५. सत्संग, ६. सत्सेवा, ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)’ – संकलक)

– आधुनिक वैद्य प्रकाश घाळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.४.२०२२)