उदयपूरच्या घटनेमागे लांगूलचालनाचे राजकारण करणारी सरकारे उत्तरदायी ! – भाजपचे नेते

कोलकाता – भाजपचे बंगालमधील नेते सुवेंदू अधिकारी यांनी उदयपूरच्या घटनेविषयी दु:ख व्यक्त करून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. अधिकारी यांनी ट्वीट करत म्हटले की, अशा घटनांना लांगूलचालनाचे राजकारण करणारी सरकारे उत्तरदायी असून ही सरकारे मतांसाठी एकतर लोकांना भडकावतात अथवा त्यांच्याकडून केलेल्या कृत्यांकडे डोळेझाक करतात. या वेळी अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा जुना व्हिडिओ टि्वट केला आहे. त्यामध्ये बॅनर्जी म्हणत आहेत की, ‘२१ जुलै या दिवशी तृणमूल काँग्रेस पक्ष वर्ष १९९३ च्या कोलकात्यात झालेल्या जाळपोळीला ‘बलीदान दिवस’ संबोधणार असून ‘आम्ही भाजपच्या विरोधात जिहाद पुकारू !’

याआधी ममता बॅनर्जी यांनी उदयपूरच्या घटनेचा निषेध केला. त्या म्हणाल्या की, काहीही झालेले, तरी हिंसा आणि कट्टरतावाद हे अस्वीकारार्हच आहे. मी उदयपूरच्या घटनेचा तीव्र निषेध करते. कायदा त्याचे काम करील. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी.