भारतातील मुसलमानांना तालिबानी मानसिकता मान्य नाही ! – अजमेर दर्ग्याचे प्रमुख जैनुल अबेदिन अली खान

डावीकडे अजमेर दर्ग्याचे प्रमुख जैनुल अबेदिन अली खान

अजमेर (राजस्थान) – मी कन्हैय्यालाल यांच्या हत्येचा तीव्र निषेध करतो आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची सरकारला विनंती करतो. भारतातील मुसलमान देशात तालिबानी मानसिकतेला थारा देणार नाहीत.

कोणताही धर्म मानवतेविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन देत नाही. विशेष करून इस्लाम शांततेचा पुरस्कार केला जातो. गरीबाची हत्या करणे, हा इस्लाममध्ये अपराध आहे, अशी प्रतिक्रिया अजमेर दर्ग्याचे प्रमुख जैनुल अबेदिन अली खान यांनी व्यक्त केली. अशा प्रकारचे कृत्य जे लोक करत आहेत, त्याने इस्लाम आणि देश अपकीर्त होत आहे, हे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.

संपादकीय भूमिका

असे आहे, तर मग तालिबानी मानसिकता असलेल्यांच्या विरोधात कधी फतवा का काढला जात नाही ?