संभल (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील गुन्नौर गावातून ३ मासांपूर्वी गायब झालेले पोलीस हवालदार शाक्तिसिंह यांचा पोलीस शोध घेत होते. शेवटी तेे हरिद्वारमधील एका मंदिरात साधना करत असल्याचे पोलिसांना समजले. पोलीस अधिकारी हरिद्वारला जाऊन त्यांना भेटले आणि पुन्हा गावी येण्याविषयी समजावू लागले. या वेळी शाक्तिसिंह यांनी सांगितले की, आता मी माझे संपूर्ण जीवन केवळ ईश्वरभक्ती करण्यासाठीच व्यतित करणार आहे. श्री हनुमान हे माझे आराध्य आहेत आणि मी त्यांची उपासना करत आहे.
UP – अचानक गायब हुआ UP पुलिस का सिपाही, 3 महीने बाद लौटा तो हनुमान भक्ति में लीन; जानें फिर क्या हुआ- #IndiaSamachar ……..https://t.co/rwMOM1Ktye
— India Samachar ™ (@indiasamachar_) June 28, 2022
पोलीस अधिकार्यांनी त्यांना समजावल्याने तो गुन्नौर गावी परतले; परंतु त्यांनी गावी आल्यावर नोकरीचे त्यागपत्र दिले. त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी आता साधनाच करण्याचे ठरवले असल्याचे सांगितले, तसेच ‘आता माझे कोणतेही घर नाही’, असेही स्पष्ट केले.
संपादकीय भूमिकापोलीस दलासारख्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या क्षेत्रात असे पोलीस असणे, हा सुखद धक्काच होय ! |