खासदारांची संसदेतील उपस्‍थिती, मागील आश्‍वासनांची पूर्ती, मतदारसंघातील कार्य आदींची माहिती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करणे आवश्‍यक !

‘सर्वोच्‍च न्‍यायालयाने निवडणुकीत तिकीट दिलेल्‍या उमेदवाराची गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी प्रसिद्ध करण्‍याचा आदेश दिला आहे, त्‍याचप्रमाणे त्‍या लोकप्रतिनिधीची विधीमंडळात, तसेच संसदीय समित्‍यांच्‍या बैठकांना किती उपस्‍थिती होती ?, त्‍याने विधीमंडळात किती जनहिताचे प्रश्‍न मांडले ?, त्‍याद्वारे त्‍याने आपल्‍या मतदारसंघातील अगोदरच्‍या निवडणुकीत आश्‍वासन दिलेल्‍या समस्‍यांपैकी किती समस्‍या सोडवल्‍या ?, ५ वर्षांच्‍या काळात त्‍याच्‍या संपत्तीत किती वाढ झाली ? आदींचीही संपूर्ण माहिती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध करण्‍याची आवश्‍यकता आहे, तरच जनतेला खर्‍या अर्थाने आपला लोकप्रतिनिधी ‘लोकसेवक’ म्‍हणून कार्य करण्‍यास लायक आहे का ? हे कळू शकेल.’

– श्री. रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती.