‘सी.बी.एस्.ई.’कडून राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत नवीन अभ्यासक्रम
नवी देहली – राष्ट्रीय शिक्षण धोरणांच्या अंतर्गत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात् सी.बी.एस्.ई.ने तिच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या अनेक विषयांच्या अभ्यासक्रमांत पालट केला आहे. या इयत्तांच्या पुस्तकांतील अनेक धडे वगळण्यात आले आहेत. याची संपूर्ण माहिती सी.बी.एस्.ई.च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम संपूर्ण देशात लागू होणार आहे. इयत्ता ११ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून ‘इस्लामचा उदय’ आणि इयत्ता १२ वीच्या पुस्तकातून ‘मोगल साम्राज्य’ हे धडे वगळण्यात आले आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड ने 2022-23 सत्र के लिए कई विषयों के सिलेबस में बदलाव किया है-#CBSESyllabus #CBSE #India https://t.co/sqgUQa3Tg8
— ABP News (@ABPNews) June 25, 2022
वगळण्यात आलेले काही धडे आणि कविता
१. फैज अहमद फैज यांची शायरी (कविता) वगळण्यात आली आहे.
२. इयत्ता ११ वीच्या ‘विश्व इतिहास’ नावाच्या पुस्तकातून ‘सेंट्रल इस्लामिक लँड’ हा धडा हटवण्यात आला आहे. या धड्यामध्ये इस्लामचा उदय, विकास, तसेच ७ व्या आणि १२ व्या शतकात इस्लामचा विस्तार यांविषयी माहिती देण्यात आली होती.
३. इयत्ता १२ वीच्या पुस्तकातून ‘पाषाणकाळामध्ये पृथ्वीवर मनुष्याचा उद्भव आणि विकास, औद्योगिक क्रांती’ हा धडा हटवण्यात आला आहे. यात इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीचे कारण, प्रभाव आणि साम्राज्यवाद यांना कसे प्रोत्सहन मिळाले, यांविषयी माहिती होती.
४. इयत्ता १२वीच्या हिंदीच्या पुस्तकातील ‘नमक’ हा धडा वगळण्यात आला आहे. या धड्यामध्ये भारताच्या फाळणीनंतर सीमेवर दोन्हींकडील विस्थापितांच्या पुनर्वसनाविषयीची कथा होती.
संपादकीय भूमिकाराष्ट्रघातकी साम्यवाद्यांनी तत्कालीन काँग्रेसी शासनकर्त्यांना हाताशी धरून शालेय अभ्यासक्रमाद्वारे हिंदूंचा तेजस्वी इतिहास लपवून ठेवून हिंदूंचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले, तर मोगल आक्रमकांचा उदाउदो केला. परिणामी हिंदूंच्या अनेक पिढ्या राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान नसलेल्या निपजल्या. असे हिंदुद्वेषी साम्यवादी आणि काँग्रेस यांना राजकीयदृष्ट्या इतिहासजमा करणे, हीच शिक्षा त्यांना योग्य ठरेल ! |