‘काँग्रेसने ५५ वर्षे भारतावर राज्य केले’, असे आपण म्हणतो; पण त्यातून तिने काय साध्य केले ? केवळ मुसलमानांचे लांगूलचालन आणि त्यांचा लाळघोटेपणा, हीच काँग्रेसची सत्ताकाळातील पुंजी ठरली. अर्थात् या पुंजीचे भीषण परिणाम देशाला अजूनही भोगावे लागत आहेत; कारण काँग्रेसच्या अतीलाडामुळे हा विशिष्ट समाज आता हिंदूंना नष्ट करण्याची इच्छा बाळगून देश बळकावू पहात आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची राजकीय शाखा असलेल्या ‘एस्.डी.पी.आय.’च्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा जन्नत अलिमा यांनी नुकतीच हिंदूंना धमकी दिली, ‘‘मुसलमानांना एक घंटा द्या. एकही हिंदुत्वनिष्ठ जिवंत रहाणार नाही, याची मी निश्चिती देते. आमच्याकडे पुरेसे सामर्थ्य आणि शक्ती आहे. आम्ही एका घंट्यात भारतातील सर्व हिंदुत्वनिष्ठांना ठार मारण्यास सिद्ध आहोत.’’ हिंदूबहुल भारतात हिंदूंनाच धमकी दिली जाते, हे तितकेच संतापजनक आणि गंभीरही आहे; कारण अशा विधानांतूनच कट्टरतावादी मुसलमानांचे घातक हेतू संपूर्ण देशासमोर येत असतात. निधर्मी देश असणाऱ्या भारतातील हिंदूंना नष्ट करण्याची भाषा करण्याचा यांना अधिकारच काय ? अशी विखारी गरळओक करणाऱ्यांवर खरेतर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! पण भारत ‘निधर्मी’ आहे म्हणूनच तर अशी कारवाई होत नाही. ‘निधर्मी’ भारताला कट्टरतावादी मुसलमानांचा पुळका आहे. ‘निधर्मी’ भारत त्यांना कधीच हात लावत नाही. त्यामुळे ‘निधर्मीपणा’ हे देशासाठी मोठे दुर्दैवच आहे’, असे म्हणावे लागेल. याचाच कट्टरतावादी अपलाभ घेतात आणि वाटेल तशी विधाने करण्यास धजावतात. याअगोदर धर्मसंसदेत कथित आक्षेपार्ह विधाने केल्याचे कारण देत उत्तराखंडमधील भाजप सरकारने हिंदूंचे महंत आणि नेते यांना अटक करून कारागृहात डांबले होते; पण हिंदूंच्या विरोधात अशी विधाने करणाऱ्यांना ना कारागृहाचा रस्ता दाखवला जातो, ना त्यांना खडसावले जाते. त्यामुळे ते अधिक शेफारतात आणि उद्दाम होतात. काही वर्षांपूर्वी अकबरूद्दीन ओवैसी यांनीही ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, आम्ही १०० कोटी हिंदूंना संपवू’, असे म्हटले होते. ती वाक्ये कालौघात विरूनही गेली. तात्पर्य काय, त्यांची विधाने केवळ ऐकून सोडून न देता किंवा त्यावरून भविष्याची कल्पना न करता त्यांचा सद्य:स्थितीतील सुप्त हेतू सर्वांनीच गांभीर्याने लक्षात घ्यायला हवा. हिंदूंना संपवण्याचे त्यांचे षड्यंत्रच अशा विधानांतून अधोरेखित होते. समाजात फूट पाडणाऱ्या अशा संघटनेवर सरकार तात्काळ बंदी का आणत नाही ? हिंदूंनी नुसते ‘हिंदुत्व’ किंवा ‘धर्म’ या शब्दांचा पुनरुच्चार केला, तरी अनेकांना पोटशूळ उठतो. मग पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी, निधर्मी, साम्यवादी, प्रसारमाध्यमे हिंदुविरोधी भूमिका घेत हिंदुत्वाला दडपू पहातात; पण धर्मांधांकडून केली जाणारी विखारी विधाने अशांना दिसत नाहीत का ? कि दिसूनही त्याकडे दुर्लक्ष करून ते हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेतात ?
असंघटितपणाची परिणती !
गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुविरोधी आणि देशविरोधी विधाने करण्याची जणू काही चढाओढच लागली आहे. मध्यंतरी पाकमधील ‘ढाई चाल’ या आगामी चित्रपटाच्या विज्ञापनात भारतविरोधी गरळओक करण्यात आली होती. ‘भारताला आतमधून इतके पोखरून टाका की, त्याच्या मनात काश्मीरचा विचारही येणार नाही’, अशा स्वरूपाची विधाने त्यात होती. ‘हिंदुत्वनिष्ठांना ब्राह्मणवादाची पुनर्स्थापना करून हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असून हे सर्व धोकादायक आहे’, हे विधान ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावरील उच्चाटन) या सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या ऑनलाईन परिषदेत करण्यात आले होते. ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे’, असे विद्वेषी विधान अलीगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत केले होते. थोडक्यात काय, तर ‘कुणीही यावे आणि हिंदूंना टपली मारून जावे’, अशी हिंदूंची गत झाली आहे, नव्हे नव्हे, ‘त्यांनी स्वतःहूनच अशी परिस्थिती ओढवून घेतली आहे’, असे म्हणता येईल. हिंदूंनो, आज तुम्ही असंघटित आहात, तसेच तुमच्यात धर्माभिमान नाही. हिंदूंची ही स्थिती ओळखून धूर्त आणि कट्टरतावादी मुसलमान हे हिंदुविरोधी विधाने करून स्वार्थ साधून घेत आहेत. तुम्हाला संपवण्याची भाषा करणाऱ्या आणि हिंदुद्वेषी विकृत मानसिकता बाळगणाऱ्या अशा संघटनांच्या विरोधात कारवाई होण्यासाठी तुमचे व्यापक संघटनच अपेक्षित आहे. आता संघटनाला पर्याय नाही. त्याच्या जोडीला धर्मशिक्षण घ्या, अन्य हिंदूंनाही ते घेण्यास सांगा आणि धर्माचरणी व्हा ! तसे झाल्यास कुणाचेही हिंदूंकडे वक्र दृष्टीने पहाण्याचे धाडस होणार नाही. विरोधकांची सध्याची विधाने म्हणजे हिंदूंच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. विरोधकांची प्रक्षोभक विधाने पहाता, रात्र वैऱ्याची आहे, हे हिंदूंनी कदापि विसरू नये.
सनातन धर्मसूर्याचा उदय !
आज सर्वत्र हिंदुत्वाचा जागर होत आहे. तोच या विरोधकांना खुपत आहे. विविध माध्यमांतून होणारे हिंदूंचे व्यापक संघटन, तसेच अनेकांकडून केला जाणारा ‘हिंदु राष्ट्रा’चा उद्घोष अन् त्या दिशेने पडणारी हिंदूंची आशादायी पावले, हे सर्व हिंदुद्वेष्ट्यांना सहन होत नाही. त्यातूनच प्रक्षोभक विधाने करण्याचा प्रकार वारंवार घडू लागला आहे. अर्थात् हिंदुत्व म्हणजे तेज आहे. तेज एकवेळ झाकोळले जाते; पण ते कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे विरोधकांना एकच सांगावेसे वाटते की, हिंदूंना संपवण्याची भाषा करू नका, हिंदू नष्ट होत असल्याची दिवास्वप्नेही पाहू नका; कारण आता सनातन धर्मसूर्याचा उदय झाला आहे. ‘हिंदु’ हा संपूर्ण जगाचा ऊर्जास्रोत आहे. त्यामुळे ‘हिंदु’, ‘हिंदुत्व’ आणि ‘हिंदु धर्म’ कधीही अन् कुणाकडूनही नष्ट होऊ शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे.