सद्गुरु सत्यवान कदम रत्नागिरी जिल्ह्यातील साधकांना मार्गदर्शनासाठी संपर्क करत असतांना मला त्यांच्या सत्संगात रहाण्याची संधी लाभली. त्या वेळी मला त्यांच्या सत्संगामुळे आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. सद्गुरु सत्यवानदादांना ‘परम पूज्य डॉक्टर’ असेच संबोधले जाणे
माझ्याकडून सद्गुरु सत्यवानदादांना हाक मारतांना प्रत्येक वेळी ‘परम पूज्य डॉक्टर’, असेच संबोधले जायचे. त्यांच्या सत्संगात मला श्रीगुरूंचे अस्तित्व अनुभवता आले.
२. मनाची निर्विचार आणि आनंदावस्था अनुभवता येणे
सद्गुरु दादांच्या सत्संगात असतांना माझ्या मनात एकही अनावश्यक आणि नकारात्मक विचार येत नव्हता. मी सतत सकारात्मक, उत्साही आणि शिकण्याच्या स्थितीत होते. त्यामुळे ‘मनाची निर्विचार स्थिती आणि आनंदावस्था कशी असते ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने अन् सद्गुरु दादांच्या आशीर्वादाने मला अनुभवता आले.
३. सद्गुरु दादांचे मार्गदर्शन ऐकतांना प्रत्येक वेळी ‘मी एका वेगळ्या लोकात असून प्रत्यक्ष भगवंत समोर बसून मला सांगत आहे’, या भावाने माझे अक्षरशः ध्यान लागत होते.
मला या अनुभूती आल्या. त्यासाठी मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
– सौ. साधना जरळी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (२८.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |