जम्मू-काश्मीरमध्ये ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

बडगाम (जम्मू-काश्मीर) – सैन्याने येथे लष्कर-ए-तोयबाच्या ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे. आशिक हुसैन हाजम गुलाम, मोही दीन डार आणि ताहिर बिन अहमद अशी त्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात चिनी बनावटीचे एक पिस्तूल, दोन काडतुसे, भारतीय बनावटीच्या २२ बंदूका, १ मॅगझिन, एके ५७ रायफल, स्फोटकांचे साहित्य, तसेच १ मोटर सायकल यांचा समावेश आहे. हे आतंकवादी स्फोटकांची ने-आण करणे आणि स्फोटके बनवणे या कामात सहभागी असल्याचे समजते. लष्कर-ए-तोयबाकडून त्यांना आर्थिक साहाय्य केले जात होते.

संपादकीय भूमिका

अशा आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा !