साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना ठार मारण्याची धमकी

नूपुर शर्मा यांचे समर्थन केल्याचा परिणाम

भाजपच्या खासदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील भाजपच्या खासदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याचा माणूस असल्याचे सांगत अज्ञाताने दूरभाष करून ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

साध्वी प्रज्ञासिंह यांनी सांगितले की, दूरभाष करणार्‍याने सांगितले, ‘तुझी हत्या होणार आहे.’ साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी नूपुर शर्मा यांचे पैगंबरांच्या कथित अवमानाच्या प्रकरणी समर्थन केले होते.