परभणी – शहरात एका अकॅडमीच्या संचालकाने १२ वर्षीय मुलाला ‘माझी झोप मोडलीस’ असे म्हणत रुळाने मारहाण केली. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात १६ जूनच्या रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रवीण खंदारे असे अकॅडमी संचालकाचे नाव आहे. पीडित मुलगा इयत्ता ७ वीत शिकत होता. अकॅडमीत आल्यावर त्याच्या पोटात दुखत असल्याने सकाळी त्याने खंदारे यांना याविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘‘हे तुझे नेहमीचेच नाटक आहे. माझी झोप मोडली.’’ त्यांनी रुळाने पाठीवर आणि डाव्या मांडीवर मारहाण करून त्याला घायाळ केले.
संपादकीय भूमिकारुळाने मारहाण करणे हे माणुसकीशून्य वर्तन होय ! |