बेंबळे (जिल्हा सोलापूर) – उजनी धरणातील पाण्याचा उपयुक्त साठा संपून पाण्याने तळ गाठला, त्यामुळे धरणाची पातळी मृतसाठ्यामध्ये गेली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उजनी धरण २१ दिवसांनंतर मृतसाठ्यात गेले आहे. सोलापूर, पुणे, नगर यांसह अनेक जिल्ह्यांसाठी उजनी धरण वरदायिनी ठरले आहे. मागील वर्षी उजनी धरण १११ टक्के म्हणजे १२३ टी.एम्.सी. भरले होते.