त्रिपुरामध्ये साम्यवाद्यांच्या राजवटीत हिंदूंचे दमन आणि सद्यःस्थिती !

१२ ते १८ जून २०२२ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे होणाऱ्या ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ च्या निमित्ताने…

१. शेवटपर्यंत मुसलमानांच्या राजवटीपासून मुक्त राहिलेले त्रिपुरा राज्य !

त्रिपुराचा इतिहास ५ सहस्र वर्षे पुरातन असून महाभारताशी जोडलेला आहे. त्रिपुरा भारताचे एक असे राज्य आहे, जेथे कधीही मुसलमानांचे शासन आले नाही. आपण आजही त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये गेलो, तर शहराच्या मध्यभागी बाजारामध्ये ‘कमान चौमोहनी’ नावाची एक जागा आहे. तेथे आपल्याला एक कमान मिळेल. त्या कमानीमागेही एक इतिहास आहे. बंगालचा सुलतान हुसेन शा याने वर्ष १५१२, १५१३ आणि १५१४ असे लागोपाठ ३ वेळा त्रिपुरावर आक्रमण केले. तेव्हा त्रिपुराचे शूरवीर हिंदु राजे धन्यमणिक यांनी त्याला मारून पिटाळून लावले. त्यानंतर वीरतेचे प्रतिक म्हणून त्यांनी ही कमान बांधली, जी आजही आगरतळाची शोभा वाढवत आहे.

२. मृत्यूशय्येवर असतांना त्रिपुराचे शेवटचे राजे महाराजा वीर विक्रम किशोर माणिकर बहादूर यांनी त्रिपुराचा पाकिस्तामध्ये समावेश करण्यास नकार देणे

त्रिपुराचे शेवटचे राजे महाराजा वीर विक्रम किशोर माणिकर बहादूर होते. त्यांच्या नावाने त्रिपुराचे सर्वांत मोठे एम्.डी.डी. महाविद्यालय आहे. वर्ष १९४७ मध्ये महाराज मृत्यूशय्येवर असतांना भारताची फाळणी होऊन पाकिस्तान जन्माला येत होता. त्या वेळी त्रिपुरा कुणासमवेत जाणार, याविषयी निर्णय करण्याविषयी प्रस्ताव आला. महाराजांना ठाऊक होते की, त्यांचा कोणत्याही क्षणी मृत्यू होणार आहे. त्यांनी पत्नी महाराणी कांचनप्रभादेवी यांना बोलावले आणि सांगितले, ‘‘बघा, आपण हिंदु आणि खरे भारतीय आहोत. भारत आपला प्राण आहे, सर्वस्व आहे. कोणत्याही परिस्थितीत माझा त्रिपुरा पाकिस्तान समवेत जाणार नाही.’’ त्यानंतर महाराणी कांचनप्रभा देवी यांच्या विरोधात अनेक षड्यंत्र रचले गेले. त्या वेळी राज परिवारावर आक्रमण करण्यात आले. पाकिस्तानच्या लोकांनी महाराणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला; परंतु महाराणी राजाला दिलेल्या वचनापासून थोडीही ढळली नाही. वर्ष १९४९ मध्ये त्रिपुराचा भारतात समावेश करण्यात आला. आमचे दुर्भाग्य आहे की, मोहनदास गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे त्रिपुराचा एक मोठा भाग पूर्व पाकिस्तानमध्ये (आताचे बांगलादेश) गेला. आता शेष राहिलेला त्रिपुराचा हा लहानसा प्रदेश आहे. त्रिपुरा लहान नव्हता. त्याचा इतिहास आणि हृदयही लहान नव्हते. त्या वेळी साम्यवाद्यांनी (कम्युनिस्टांनी) पाकिस्तानचा जो नकाशा बनवला, त्यामध्ये त्रिपुरा पाकिस्तानला देण्याचा प्रस्ताव केला होता; परंतु महाराजांमुळे त्रिपुरा भारतात राहिला.

श्री. प्रसेनजित चक्रवर्ती

३. साम्यवाद्यांच्या ३५ वर्षे राजवटीत त्रिपुराची अधोगती होणे, तसेच हिंदूंवर अत्याचार करण्यात येणे

अशा या त्रिपुरामध्ये गेली ३५ वर्षे देशद्रोही आणि धर्मद्रोही साम्यवाद्यांचे सरकार राहिले आहे. केरळ आणि बंगाल राज्यांतील लोकांना साम्यवाद्यांचे राज्य काय असते, याची चांगली माहिती आहे. वर्ष १९७८ मध्ये जेव्हा सर्वप्रथम हे डावे सत्तेत आले, तेव्हा त्रिपुरामध्ये दारिद्र्यरेषेखालील परिवारांची संख्या ५६ टक्के होती. जेव्हा ते ३ मार्च २०१८ ला सत्तेवरून पाय उतार झाले, तेव्हा ही रेषा ६७ टक्के झाली होती. ते जेव्हा सत्तेवर आले, तेव्हा त्रिपुरामध्ये ६८ सहस्र युवक बेरोजगार होते. जेव्हा ते सत्तेवरून पायउतार झाले होते, तोपर्यंत ही संख्या ८ पटींनी वाढली. साम्यवादी हे हिंदु धर्मावर विश्वास ठेवत नाहीत; कारण त्यांची श्रद्धा कार्ल मार्क्सवर आहे. त्याचे हिंदु धर्माविषयी एक पुस्तक आहे. मी महाविद्यालयात शिकत असतांना ते आवर्जून वाचले. त्या पुस्तकामध्ये कार्ल मार्क्सने हिंदु धर्माप्रती अत्यंत घृणास्पद लिखाण केले आहे. ते वाचून हिंदु धर्माविषयी साम्यवाद्यांच्या मनात आपोआप घृणा निर्माण होते.

४. त्रिपुराच्या साम्यवादी सरकारच्या मंत्र्याचे पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’शी संबंध उघड होणे

मी एका वर्तमानपत्रात काम केले. त्यात मी त्रिपुरामध्ये आलेल्या ‘सायंस्टिस्ट इंटलेजियन्स’च्या प्रदूषणाविषयी एक मालिका प्रकाशित केली. एका गोष्टीत मी सांगितले , ‘पाकिस्ताची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’ त्रिपुराच्या मंत्र्यांच्या घरापर्यंत पोचली आहे.’ माझ्या संशोधनाची चौकशी करण्यात आली. याविषयी सर्व माहिती माहितीजालवर (इंटरनेटवर) प्रसारित झाली होती. ही कथा आल्यानंतर संपादकाने मला विचारले, ‘हे प्रत्येक ठिकाणी कसे दिसणार आहे ?’ मी त्यांना विचारले की, ‘आय.एस्.आय.’वाले त्यांच्या शरिरावर ओळखपत्र लावून फिरतात का ?’ एक पोलीस महानिरीक्षक मला म्हणाले, ‘‘प्रसेनजित, काय म्हणतात ? ‘आय.एस्.आय.’ला पाहिले आहे ? असे कुठे होते का ? मी म्हणालो, ‘‘साहेब, आय.एस्.आय. स्वतःच त्याचे प्रमाण देईल. तुम्ही चिंता करू नका.’’

वर्ष २००६ च्या जानेवारीमध्ये माझी कथा मालिका आली. वर्ष २००८ चा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मास असेल. तेथील माणिक सरकारचा मंत्री शहीद चौधरी यांचा एक नातेवाईक मामुली बांगलादेशी ‘हुजी’ आणि ‘आय.एस्.आय.’ यांचा थेट हस्तक होता. त्याला भारतीय सैन्याने आगरताळावरून पकडले. त्याला पकडल्यानंतर सर्व प्रसारमाध्यमांतून बातमी आली की, मंत्र्याचा नातेवाईक असलेल्या ‘आय.एस्.आय.’च्या हस्तकाला आगरताळामध्ये भाड्याच्या घरात पकडले गेले. तो मंत्र्याच्या घरी प्रतिदिन जात होता, हेही सांगण्यात आले. मंत्र्याच्या पत्नीशी त्याचा संपर्क होता. त्या मंत्र्याला नंतर त्यागपत्र द्यावे लागले. त्यानंतर कितीतरी हस्तक आगरताळावरून पकडले गेले. २ वर्षांपूवी मी कथा दिल्यानंतर एका मागून एक उघडकीस यायला लागले.

५. त्रिपुराला देशद्रोही शक्तीपासून वाचवण्यसाठी प्रयत्न करणे आवश्यक !

आपल्या देशात आपण एका मायामोहात जगत आहोत. जे उघड सत्य आहे, ते आम्ही पहात नाही. कुणी दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. आपल्याला मौन राहून जगणे आवडते. त्रिपुरा हे उत्तर पूर्वांचलपूरमध्येच नाही, तर बाजूच्या म्यानमार, सिंगापूर इत्यादी देशांच्या दृष्टीने सर्वांचे फार महत्त्वाचे केंद्र आहे. आता सक्रीय धोरणामध्ये भारत सरकारही त्रिपुराला केंद्रस्थानी बनवत आहे. त्यामुळे देशद्रोह्यांची त्रिपुरावर सर्वांत मोठी दृष्टी आहे. त्यामुळे भारतातील सर्व मठ, मंदिरे आणि आश्रम यांनी त्रिपुरामध्ये त्यांच्या शाखा उघडाव्यात. त्रिपुरामध्ये संपूर्ण वर्षभराचा कार्यक्रम व्हावा, त्रिपुराला केंद्रस्थानी बनवावे. उत्तर पूर्वांचल, मिझोराम, नागालँड, मेघालय, मणीपूर, अरुणाचल आणि आसाम या सर्वांना वाचवायचे आहे. त्यांच्यावर चीनची दृष्टी आहे. चीनने हा भाग भारतापासून तोडण्यासाठी अतिशय मोठे षड्यंत्र रचले आहे. ‘इस्लामिक स्टेट’साठी बांगलादेशातील अनेक जिहादी संघटना काम करत आहेत.

६. हिंदु राष्ट्राची स्थापना जगभर होईल आणि हे कार्य कुणीही थांबवू शकत नाही !

राष्ट्रवादामध्ये लहान लहान प्रदेशांना कोणतेच स्थान नसते. आपल्या राष्ट्रवादामध्ये पुष्कळ राष्ट्रवादी नेते आणि संस्था आहेत; परंतु लहान लहान प्रदेशांच्या लोकांना बोलण्याची संधी दिली जात नाही. माझ्यासाठी हिंदु जनजागृती समिती ही राष्ट्रवादी संघटना सर्वांत मोठी आहे, जी तेथील समस्यांचा विचार करत आहे. तेथील लोकांनाही काही सांगायचे आहे. त्यांचे म्हणणे त्यांच्याकडूनच ऐकावे. असे फार मोठ्या प्रमाणात प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे. या देशाला सर्वांच्याकडून शिकायचे आहे. आज त्रिपुरामध्येही ९० टक्के लोक हिंदु आहेत. त्रिपुरा बांगलादेशाने चारीही बाजूने वेढलेला आहे. आमच्यावर साम्यवाद्यांचे, ख्रिस्त्यांचे आणि धर्मांधांचे कितीतरी अत्याचार झाले, तरीही तेथे ९० टक्के हिंदू आहेत. त्यावरून त्यांची धर्माप्रती असलेली निष्ठा लक्षात येते. आपल्याला संपूर्ण भारतच नाही, तर संपूर्ण विश्वाला जागृत करायचे आहे आणि विश्वगुरु बनायचे आहे. हिंदु राष्ट्र जगभर बनेल. जगात अशी कोणतीही शक्ती नाही, जी हे कार्य थांबवू शकेल.

– श्री. प्रसेनजित चक्रवर्ती, भाजप, त्रिपुरा