पैगंबरांच्या कथित अवमानावरून इस्लामी देशांना चिथावणी देणार्‍या भारतीय नागरिकांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा !  

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांची मागणी

केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर

नवी देहली – महंमद पैगंबर यांच्या कथित अवमानाविषयी इस्लामी देशांना भारताविरुद्ध चिथावणी देणार्‍या भारतीय नागरिकांची सूची बनवून त्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी केली. ‘त्यांच्याकडून देशविरोधी कृत्य घडत आहे. अशा प्रकरणात त्यांची मालमत्ताही जप्त केली जाऊ शकते,’ असेही माहूरकर म्हणाले. या मागणीवर टीका करतांना सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी ‘घटनात्मक यंत्रणा पद्धतशीरपणे संपवण्याचे सरकारचे काम चालू आहे’, असा आरोप केला.

माहूरकर पुढे म्हणाले की, इस्लामी विचारांचे नागरिक आणि डावे माझ्या मतावर आक्षेप घेतात; मात्र त्यांनी कधी झाकीर नाईक आणि म.फि. हुसेन यांना प्रश्‍न का विचारले नाहीत ? धर्मनिरपेक्षता एकतर्फी कशी असू शकते ? हिंदूंच्या तडजोडीवरच हिंदु-मुसलमान एकतेची अपेक्षा ठेवण्याचा काळ गेला असून हा नवा भारत आहे.

संपादकीय भूमिका

हे सांगावे का लागते ? सरकार स्वतःहून का कृती करत नाही ? सरकार अशी कृती करील, याचीही हिंदूंना शाश्‍वती वाटत नाही, हेही तितेकच खरे !