जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड !

गोविंद तिवारी

जळगाव, ९ जून (वार्ता.) – हिंदू महासभेचे अधिवेशन ३ जून या दिवशी कोल्हापूर येथे पार पडले. या अधिवेशनात जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या वेळी ‘हिंदू महासभेसाठी अधिवक्त्यांचा एक गट निर्माण केला जाईल. संघटनात्मक राजकीय वाढीसंदर्भात येत्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कार्य केले जाईल’, असे आश्वासन त्यांनी दिले.