नाशिक येथे शिवलिंगाच्या विटंबनेच्या विरोधात भाजपचा मोर्चा !

नाशिक – सामाजिक माध्यमांवर शिवलिंगाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ येथे भाजपच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ७ जून या दिवशी मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी नितेश राणे यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना या मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या.

(सौजन्य : ABP MAJHA)

पत्रकारांशी बोलतांना नितेश राणे म्हणाले की,…

१. ‘इंस्टाग्राम’ माध्यमावर शिवलिंगाच्या विटंबनेची एक पोस्ट करण्यात आली. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी पोलिसांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला; मात्र पोलिसांनी साधी नोंदही घेतली नाही. उलट प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. (मुसलमानांनी केलेल्या तक्रारींची त्वरित नोंद घेणारे पोलीस हिंदूंच्या तक्रारींची नोंद का घेत नाहीत ? यावरून ‘पोलीस हिंदुद्वेषी आहेत’, असे म्हणायचे का ? पोलिसांच्या अशा वर्तनामुळे हिंदूंचा पोलिसांवरील विश्वास अल्प होत आहे. – संपादक)

२. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात पोस्ट लिहिल्यास त्वरित कारवाई केली जाते; पण या प्रकरणात अद्याप कारवाई झालेली नाही. पोस्ट करणाऱ्या मुलाचे वय अल्प असेल; पण त्याच्यामागे कोण आहे, हे शोधण्याचे काम पोलिसांनी करावे.

३. आम्ही संयम सोडला, तर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेची भाषा करू नये. हीच पोस्ट इतर धर्मियांविषयी असती, तर दंगल घडली असती. (हे पोलिसांच्या कसे लक्षात येत नाही ? कि ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात ? – संपादक)

४. खासदार शरद पवार यांच्या विरोधात अभिनेत्री केतकी चितळे यांनी पोस्ट केल्यानंतर तिला कारागृहात टाकले जाते. हिंदु आहोत म्हणून शांततेत मोर्चे निघत आहेत.

संपादकीय भूमिका 

  • श्रद्धास्थानांची विटंबना रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित आणि सक्षम होणे आवश्यक !
  • अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांची विटंबना करण्याचे धाडस कुणी का करत नाही ? हे हिंदूंनी लक्षात घ्यावे !