परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव सोहळा
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मंगलमय रथोत्सवाच्या दिवशी मला आलेला थकवा न्यून झाला आणि मला पुष्कळ उत्साह वाटू लागला.
२. रथोत्सवात साधिका नृत्य करत असतांना ‘मी शिवलोकात आहे आणि तिथेच नृत्य चालू आहे’, असे मला जाणवले.
३. रथोत्सवाच्या दिवशी मी वेगळेच वातावरण अनुभवत होतो. दुपारी ३.३० वाजता प्रत्यक्ष रथोत्सवास आरंभ झाला. तेव्हापासून माझा भाव दाटून येत होता. माझी ही भावस्थिती रथोत्सवाची सांगता होईपर्यंत टिकून होती.
४. ‘रथोत्सव संपूच नये’, असे मला वाटत होते.
५. रथोत्सवाची सांगता झाल्यावर मी रामनाथी आश्रमात पोचलो. तेव्हा ‘श्रीराम शाळिग्राम’ असलेल्या पालखीचे दर्शन झाल्यावर माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
मला या अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
– श्री. नागराज कुवेलकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२२)