(म्हणे) ‘बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्राचा इतिहास नासवला !’ – जितेंद्र आव्हाड यांचे विखारी वक्तव्य

बाबासाहेब पुरंदरे आणि जितेंद्र आव्हाड

पुणे – बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडलेल्या इतिहासावरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यांनी चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडून नासवल्याचे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी पुरंदरे यांच्यावर विखारी वक्तव्य करत टीका केली. ‘पुरंदरे यांचे ‘शिवचरित्र’ हे फूट निर्माण होण्याचे मूळ कारण आहे. हिंदु-मुसलमान वादही पुरंदरे यांच्या शिवचरित्रानंतर जन्माला आला’, असे आव्हाड म्हणाले. ‘कनेक्ट महाराष्ट्र कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रमानिमित्त केलेल्या भाषणात आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपादकीय भूमिका

  • सातत्याने बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या लिखाणाचा संदर्भ देत वाद उकरून काढण्याची आव्हाड यांची खोड जुनीच आहे !
  • कायम प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी त्यांनी केलेला हा प्रसिद्धीचा स्टंटच आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?