मला कराची येथील कसोटीत सचिन तेंडुलकरला घायाळ करायचे होते !

पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती

इस्लामाबाद (पाकिस्तान) – वर्ष २००६ मध्ये कराची येथे झालेल्या एका कसोटी सामन्यात मी सचिन तेंडुलकर याला जाणीवपूर्वक घायाळ करण्याच्या प्रयत्नात होतो, अशी स्वीकृती पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने दिली. ‘स्पोर्ट्सकीडा’ या क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही स्वीकृती दिली.
शोएब अख्तर याने सांगितले की,  सचिनला कोणत्याही किमतीत घायाळ करण्याचा मी निश्‍चय केला होता. तत्कालीन कर्णधार इंझमाम उल् हक मला सरळ रेषेत गोलंदाजी करण्यास सांगत होता; पण मला तर सचिनला घायाळ करायचे होते. यासाठी मी त्याला त्याच्या शिरस्त्राणाच्या दिशेने चेंडू टाकले. त्यानंतर मला आनंदही झाला होता; पण जेव्हा मी त्या घटनेचा व्हिडिओ पाहिला, तेव्हा मला दिसले की, सचिन त्याचे डोके वाचवण्यात यशस्वी झाला होता.

संपादकीय भूमिका

  • पाकिस्तानच्या खेळाडूंचा भारतद्वेष ! पाकचे खेळाडू भारताशी खिलाडूवृत्तीने खेळत नाहीत, हेच यातून लक्षात येते. त्यामुळे अशा देशासमवेत भारताने कोणताही खेळ खेळू नये !
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !