संसद आणि न्यायालय यांद्वारे प्रश्न सोडवण्याची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका ! – दिलीप देवधर, संघ अभ्यासक आणि विश्लेषक

श्री. दिलीप देवधर

नागपूर – येणारी २५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सत्ताधारी रहाणार आहे आणि न्यायपालिका अन् संसदीय प्रणाली यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावणार आहे, हीच संघाची भूमिका आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सत्तेत असतांनाच औरंगजेबी मशीद पाडून सोमनाथ मंदिर बांधले. त्याचे उद्घाटन तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी केले होते. त्यामुळे संघ कोणत्याही आंदोलनात उतरणार नाही. आंदोलने केली, तरी ती हिंदु समाज करील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक आणि विश्लेषक दिलीप देवधर यांनी ३ जून या दिवशी येथे एका दैनिकाच्या प्रतिनिधीशी बोलतांना केले.