शोधनिबंधाचे लेखक आहेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले, तर सहलेखक आहेत श्री. क्लार्क ! |
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरव ! |
मुंबई – अध्यात्मात लिंगाच्या आधारे भेदभाव असत नाही. अध्यात्मात स्त्री आणि पुरुष या दोघांनाही आध्यात्मिक उन्नती करण्याची संधी समान असते, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते श्रीलंका येथे आयोजित ‘द एट्थ वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन वुमन्स स्टडिज्’ या वैज्ञानिक परिषदेत बोलत होते. या परिषदेचे आयोजन ‘द इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मॅनेजमेंट’ यांनी केले होते.
श्री. क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले लिखित ‘आध्यात्मिक उन्नतीशी निगडित लिंगाच्या आधारे भेदभावाला आव्हान’ हा शोधनिबंध ‘ऑनलाईन’ सादर केला. हे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ९३ वे सादरीकरण होते. या शोधनिबंधाला या परिषदेत ‘उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.
श्री. शॉन क्लार्क यांनी या परिषदेत मांडलेली निवडक सूत्रे,
१. या संशोधनाच्या वेळी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या ऊर्जा आणि प्रभामंडळ मापक यंत्राच्या आधारे २४ साधकांच्या (पुरुष आणि स्त्रिया) प्रभावळींचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये ‘पुरुष, तसेच स्त्रिया दैनंदिन आध्यात्मिक साधनेने आध्यात्मिक उन्नती करू शकतात’, हे स्पष्ट झाले.
२. पुरुष आणि स्त्रियांच्या गुणवैशिष्ट्यांचा विचार करता पुरुषांच्या तुलनेत सर्वसाधारणतः स्त्रियांमधील ‘भावनाशीलता’ हा दोष त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीमधील सर्वांत मोठा अडथळा असल्याचे आढळले. मात्र स्त्रियांमध्ये बुद्धीचा अडथळा अल्प (कमी) आणि श्रद्धा अधिक असते, ही त्यांची जमेची बाजू होय. आध्यात्मिक उन्नतीसाठी श्रद्धा अत्यंत महत्त्वाची असते.
३. पुरुष आणि स्त्री हे दोघेही एकमेकांपासून शिकू शकतात, तसेच साधनेसाठी केलेल्या प्रयत्नांवर आध्यात्मिक उन्न्ती अवलंबून असते आणि इतरांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याची क्षमता व्यक्तीच्या आध्यात्मिक पातळीवर आणि ज्ञानप्राप्तीवर अवलंबून असते.