वैराग्य वसंता येता बहर ।
अहं ब्रह्मरूप येतो अमूप मोहोर ।। १ ।।
न जाता आता फार काळ ।
ब्रह्मप्राप्ती रूप आले फळ ।। २ ।।
बुद्धीचिया पोटी आली विरक्ती ।
संसार परमार्थाची गेली आसक्ती ।। ३ ।।
चालता पाऊल पुढे तेथे मोक्ष खाण ।
न पडे मग कशाचीच वाण ।। ४ ।।
– कृष्णपुष्प (पुष्पांजली, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), बेळगाव (१८.८.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |