ठाणे, २९ मे (वार्ता.) – भाजप गेल्या ८ वर्षांत महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ यांसह विकासाच्या सूत्रांवर बोलत नाही, तर केवळ कलम ३७०, बाबरी मशीद, राममंदिर, भोंगे, अजान, नकाब याच सूत्रांवर बोलून देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करत आहे, असे विधान एम्.आय.एम्.चे पक्षप्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले. २८ मे या दिवशी भिवंडी येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
ओवैसी पुढे म्हणाले, ‘‘ देशात महागाई आणि बेरोजगारी यांची समस्या वाढली आहे; मात्र मोदी सरकार मंदिर आणि मशीद या वादात अडकले आहे. ताजमहाल आणि लाल किल्ला येथे खोदकामाची मागणी केली जाते; पण हे खोदकाम करून भाजप अन् संघ हे पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेची डिग्री शोधत आहेत.’’ (ताजमहाल आणि लाल किल्ला येथे खोदकाम केल्यास काय निष्पन्न होईल, हे ओवैसी यांना ठाऊक असल्याने पंतप्रधानांवर टीका करून ते खोदकामाच्या सूत्राला एकप्रकारे बगल देत आहेत. त्यांचा हा धूर्तपणा जनता जाणून आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाराष्ट्र आणि धर्म कार्य केल्यावर ओवैसींना पोटशूळ उठला नाही तरच नवल ! |