परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्मरणामुळे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. प्रार्थना प्रसाद देव यांना स्वतःत जाणवलेले पालट 

मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सतत स्मरण करत असते. त्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेत पुष्कळ चांगले पालट होत आहेत.

सौ. प्रार्थना देव

१. प्राप्त परिस्थिती स्वीकारून आनंद अनुभवता येणे

मागील वर्षभरात कार्यालयीन कामांमुळे, तसेच घरातील काही अडचणींमुळे मला आश्रमातून सारखे घरी जावे लागले. त्या वेळची परिस्थिती मला स्वीकारता येत नव्हती. त्यामुळे माझ्या मनाचा पुष्कळ संघर्ष होत होता. मी फार अस्वस्थ असायचे. आता मला ‘प्राप्त परिस्थितीत काय करता येण्यासारखे आहे ? काय केले की, मला आनंद मिळेल ?’, याचा अभ्यास करून त्यानुसार कृती करता येत आहे. त्यामुळे माझ्या मनावरील ताण न्यून होऊन मला आनंद अनुभवता येत आहे.

२. साधकांच्या चुका प्रतिक्रियाविरहित सांगता येणे

पूर्वी साधकांच्या चुका दिसल्यावर माझ्या मनात त्यांच्याविषयी प्रतिक्रिया येऊन काही कालावधीसाठी माझे मन अस्वस्थ असायचे. आता साधकांच्या चुका दिसल्यावर ‘ते साधकही माझ्याप्रमाणे साधनेचे प्रयत्न करत आहेत. त्यांच्यात पालट व्हायला काही कालावधी लागणार आहे’, असे मला वाटते. त्यामुळे गुरुदेवांच्या कृपेने मी त्या साधकांना साधनेत साहाय्य होण्याच्या दृष्टीने त्यांच्या चुका योग्य शब्दांत प्रतिक्रियाविरहित सांगण्याचा प्रयत्न करते.

३. एकाच वेळी अनेक सेवा आल्यावर मनावर ताण न येता सेवेतील आनंद अनुभवता येणे

पूर्वी माझ्याकडे अनेक सेवा एकाच वेळी आल्यावर मनावर ताण येऊन गोंधळ निर्माण होत असे. आता माझ्याकडे अनेक सेवा आल्यावर ‘गुरुदेवांना मला सतत सेवारत ठेवून आनंद अनुभवायला द्यायचा आहे’, या विचारांमुळे सेवेतील आनंद अनुभवता येतो.

– सौ. प्रार्थना प्रसाद देव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.२.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक