‘लष्कर-ए-तोयबा’च्या संपर्कात असलेल्या पुण्यातील मुसलमानाला अटक !

पुणे – आतंकवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’च्या संपर्कात असलेला येथील महंमद जुनेद याला आतंकवादविरोधी पथकाने दापोडीतून अटक केली. लष्कर-ए-तोयबासाठी काम करण्यासाठी त्याला जम्मू-काश्मीर येथून ‘गजवा ए हिंद’ या नावाच्या खात्यातून १० सहस्र रुपये मिळाले होते, असे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. जुनेद हा मूळचा खामगाव (जिल्हा बुलढाणा) येथील रहिवासी आहे. तो मागील दीड वर्षापासून पुण्यात रहात होता. जुनेदचे शिक्षण मदरशात झाले आहे. (हे आहे मदरशांचे खरे वास्तव ! आजपर्यंत देशभरात बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक केलेले अनेक धर्मांध आरोपी, आतंकवादी आणि जिहादी हे आतंकवादी कृत्ये करण्यामागे त्यांना मदरशांतून मिळत असलेले शिक्षण हेच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. असे असतांनाही भारतात मोठ्या प्रमाणात मदरसे चालू आहेत. ‘मदरशांमध्ये जिहाद, आतंकवाद आणि राष्ट्रद्रोह यांना खतपाणी घालण्याचे शिक्षण दिले जाते’, असे सांगत फ्रान्सने अनेक मदरसे बंद केले. भारत सरकार फ्रान्सचा आदर्श समोर ठेवणार का ? – संपादक)

जुनेद हा सामाजिक माध्यमातून जम्मू काश्मीरमधील लष्कर ए तोयबाच्या संपर्कात आला होता. चौकशीमध्ये दोषी आढळल्याच्या प्रकरणी जुनेदवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २४ मे या दिवशी जुनेदला पुण्यातील न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. लष्कर-ए-तोयबा ही दक्षिण आशियात कार्यरत असणारी आतंकवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, युरोपियन युनियन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांत या संघटनेवर बंदी आहे.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या वाढत्या सहभागावरून ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सूत्र सिद्ध होते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ?