नेहरू आसाम पाकिस्तानला देणार होते !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा आरोप

या आरोपांचे काँग्रेसवाले खंडण करणार का ?

हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – नेहरू आसाम पाकिस्तानला देणार होते, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करतांना केला. राहुल गांधी यांनी लंडन येथे एका कार्यक्रमात बोलतांना म्हटले होते, ‘भारत एक विकसीत देश नव्हता. त्या वेळी राज्यांना एकत्र आणण्यासाठी चर्चा करण्यात आली होती. शांतता निर्माण करण्यात आली. त्यात आसाम, उत्तरप्रदेश, महराष्ट्र आदी देशांचा समावेश होता.’ या विधानावर मुख्यमंत्री सरमा यांनी वरील उत्तर दिले.

मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटले, ‘गांधी यांच्या समर्थनाद्वारे गोपीनाथ बोरदोलोई यांनी आसामला भारतासमवेत ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला; कारण नेहरू यांच्या योजनुसार त्यांनी आसामला पाकसमेवत रहाण्यासाठी सोडले होते. राहुल गांधी यांनी त्यांच्याकडील माहिती सुधारावी.’