ऑस्ट्रेलियामध्ये अँथनी अल्बानीस नवे पंतप्रधान होणार !

अँथनी अल्बानीस

मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचा पराभव झाला. त्यांच्या जागी अँथनी अल्बानीस हे पंतप्रधान होणार आहेत. मॉरिसन हे चीनविरोधक मानले जात होते, तर अल्बानीस चीनशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या विचारांचे आहेत. अल्बानीस यांचे भारताशी चांगले संबंध असल्याचे म्हटले जाते.