मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील मुसलमानबहुल जंघावली गावामध्ये १८ मे या दिवशी हरियाणा पोलीस हे फसवणुकीच्या प्रकरणी नोमान या आरोपीला पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मुसलमानांनी आक्रमण केले. यात ५ पोलीस घायाळ झाले. यात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. पोलिसांनी नोमान याला पकडलेही होते; मात्र पोलिसांवर आक्रमण करण्यात आल्यानंतर त्याला सोडवून पळण्यास साहाय्य करण्यात आले. या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यासाठी हवेत गोळीबारही करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी एकूण १८ जणांना अटक केली आहे. यात ९ महिलांचा समावेश आहे. एकूण ३४ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकादेशात अनेकदा अशा घटना घडत असतात; मात्र एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी किंवा एकही राजकीय पक्ष याविषयी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! हिंदूंकडून कधीही अशा प्रकारची घटना घडत नाही, हे लक्षात घ्या ! |