२.५.२०२१ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ भावसत्संग झाला. त्यात यापूर्वी झालेल्या जन्मोत्सवाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना ‘श्रीकृष्ण आणि श्रीराम’ यांच्या रूपात दिलेल्या दर्शनाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती पहातांना मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. स्थुलातून गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) अशक्त वाटत होते; परंतु त्यांचा तोंडवळा तेजस्वी दिसत होता. गुरुदेवांचा स्थूलदेह नश्वर आहे; मात्र त्यांच्याकडून येणारे चैतन्य अनंत आणि शाश्वत आहे.
२. ध्वनीचित्र-चकतीत मधून मधून गुरुदेव बसलेल्या संपूर्ण कक्षाचे चित्रीकरण दाखवण्यात येत होते; परंतु माझे लक्ष गुरुदेवांवरच खिळून होते. ‘त्या कक्षात सर्वत्र चैतन्य पसरले आहे आणि त्याचे उगमस्थान गुरुदेव बसलेले ठिकाण आहे’, असे मला जाणवत होते.
३. कार्यक्रमात एका बालसाधिकेने नृत्य केले. ते चालू असतांना मला ढेकरा येत असल्यामुळे अस्वस्थ वाटत होते. ‘नृत्यातील संगीतामुळे मला आध्यात्मिक लाभ होऊन माझ्याभोवती असलेले त्रासदायक (काळे) आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवले.
४. भावसत्संगाचे सत्र रात्री उशिरा होते. त्यामुळे सत्रापूर्वी मला झोप येत होती; पण सत्र चालू होताक्षणी माझी झोप नाहीशी झाली.
५. कार्यक्रमात आरती चालू असतांना माझे मन अत्यंत शांत होते.
६. भावसत्संगानंतर मला शांत झोप लागली.
– श्री. मयूर अवघडे, सनीवेल, अमेरिका. (२९.७.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |