१. श्रीमती श्वेता जग्गी
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनानंतर झोप येणे आणि स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांसारख्या व्यक्तीने साधनेविषयी मार्गदर्शन केल्याचे दिसणे : ‘जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त झालेल्या सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या मार्गदर्शनानंतर ५ मिनिटे मला झोप आली. झोप आल्यानंतर त्वरित मला स्वप्नात दिसले, ‘एक पांढरा सदरा आणि पायजमा घातलेली व्यक्ती मला साधनेत पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. तिने मला प्रतिदिन स्वयंसूचना सत्रे करायला सांगितली आणि नामजपादी उपायही सांगितले. ती व्यक्ती हुबेहूब परात्पर गुरु डॉक्टरांसारखी दिसत होती.’
२. श्री. राजीव भाटिया
‘ऑनलाईन’ सोहळ्याची चाचणी करत असतांना फुलांचा सुगंध येणे : ‘१३.५.२०२० या दिवशी आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा ‘ऑनलाईन’ पहायचा होता. आदल्या दिवशी त्याची चाचणी (टेस्टिंग) करत असतांना आगाशीत मला काही क्षण फुलांचा सुगंध येत होता.’
(सर्व सूत्रांचा मास : मे २०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |