नीमच (मध्यप्रदेश) – येथील जुनी कचेरी परिसरात १६ मेच्या रात्री धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले. येथील दर्ग्याजवळ श्री हनुमानाची मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यावरून त्यांनी आक्रमण केले. त्याला हिंदूंकडून प्रत्युत्तर देण्यात आले. यामुळे येथे हिंसाचार झाला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून येथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या वेळी अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली असून जाळपोळीच्या घटनाही समोर आल्या आहेत. पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही बाजूचे लोक येथे जमले होते, त्यांच्यात वादावादी चालू होती. त्यामुळे दोन्ही समाजाच्या लोकांना नियंत्रण कक्षात बोलावण्यात आले; पण त्यानंतर काही लोकांनी दगडफेक केली. यात कुणीही घायाळ झाले नाही.
A man identified as Yousuf was injured in the violence while a bike and a cooler at the shrine were set on fire.https://t.co/c5JtTokwll
— Hindustan Times (@htTweets) May 17, 2022
संपादकीय भूमिका
|