परात्पर गुरु डॉ. आठवले उन्नत जिवांकडून धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक असलेले कार्य करवून घेत असणे

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘गुरु-शिष्य’ नाते हे जगातील सर्वाेत्कृष्ट नाते आहे. गुरूंचे कार्य शिष्य आणि समाज यांच्यापर्यंतच सीमित असते; पण ईश्वराचा अवतारच ‘गुरु’ या रूपात प्रकट झाला, तर ‘त्याचे कार्य कसे असेल ?’, याचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे अलौकिक कार्य !’ आधुनिक वैद्य, आदर्श पुत्र, आदर्श पती, उत्तम शिष्य, अनेक ग्रंथांचे संकलक, गुरु, द्रष्टा, संशोधक, अशा अनेक रूपांमध्ये कार्य करणाऱ्या गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अवतारी कार्य कसे अलौकिक आहे ?’, हे या लेखांतून क्रमशः जाणून घेणार आहोत.

(भाग ३)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/579996.html


१. अवताराचा जन्म होत असतांना उन्नत जिवांचा अवताराच्या कार्यपूर्तीसाठी जन्म होणे

अवतार त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी अनेक माध्यमे निवडतो. तो भक्तांच्या माध्यमातूनही कार्य करवून घेतो. अवतार पृथ्वीवर जन्माला येत असतांना त्याच्याच इच्छेने काही उन्नत जिवांचाही जन्म होतो. असे जीव अवताराच्या कार्याच्या पूर्तीसाठीच जन्माला आलेले असतात. त्या जिवांचे अन्य काही ध्येय नसते. ते अवताराच्या परिवारातील सदस्य असल्याप्रमाणे आहेत.

अशा सर्व उन्नत जिवांनी एकच कार्य केले, तर ईश्वरी कार्याचा समतोल बिघडेल आणि कार्यही विस्कटेल; म्हणून अवतार त्या उन्नत जिवांना कार्याची पद्धत अन् त्यांच्या ईश्वरप्राप्तीचा मार्ग आखून देतो.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी उन्नत जिवांची क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन करून घडवणे

श्री. विनायक शानभाग

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आधीपासूनच अशा उन्नत जिवांची क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन करून घडवले आहे. खरेतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक उन्नत जीव घडवले आहेत. त्यांतील काही उदाहरणे पुढे दिली आहेत.

२ अ. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे : राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

२ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ : साधकांना होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांच्या निवारणार्थ नामजपादी उपाय शोधणे

२ इ. सद्गुरु सिरियाक वाले : विदेशातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे

२ ई. सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये : साधकांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याकडून परिपूर्ण सेवा करवून घेणे

२ उ. पू. संदीप आळशी : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी संकलित केलेल्या ग्रंथसंपदेसंबंधी सेवा करणे

२ ऊ. पू. (सुश्री (कु.)) रेखा काणकोणकर : रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णा कक्षातील साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अशा अनेक उन्नत जिवांना घडवले आहे. गुरुदेव अशा उन्नतांकडून धर्मसंस्थापनेसाठी आवश्यक असलेले कार्य करवून घेत आहेत. केवळ ईश्वराच्या अवतारालाच हे कार्य करणे शक्य आहे.

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), चेन्नई, तमिळनाडू. (१०.५.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/580658.html