ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाविषयी १७ मे ला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी देहली – ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाच्या दिवाणी न्यायालयाच्या आदेशाला ‘अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटी’ने अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यावर ‘कमिटी’ने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून सर्वेक्षण रोखण्याची मागणी केली होती; परंतु न्यायालयाने सर्वेक्षण रोखण्यास नकार दिला होता. या याचिकेवर १७ मे या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे. यावर न्यायालय काय आदेश देणार, हे पहावे लागणार आहे; कारण सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे.

आता कमिटीकडून ‘सर्वेक्षणाचा अहवाल सार्वजनिक करू नये’, अशी मागणी केली जाऊ शकते, असे सांगितले जात आहे.