‘कॉप्स’ विद्यार्थी संघटनेची मागणी !
इंदापूर (पुणे) – विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी टाळण्यासाठी आणि पालकांना या अनधिकृत शाळांची माहिती होण्यासाठी राज्यातील अनधिकृत ७६४ शाळांची माहिती राज्य सरकारने त्वरित घोषित करावी, अशी मागणी ‘कॉप्स’ संघटनेने केली आहे. या शाळांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर, तसेच नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले होते.
या प्रकरणी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत, असे ‘कॉप्स’ संघटनेचे अध्यक्ष अमर एकाड आणि युवक अध्यक्ष अलीक कनोजिया यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी विद्यार्थी संघटनेला का करावी लागते ? प्रशासनाने स्वतःहून अनधिकृत शाळांची सूची घोषित करून तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालक यांची हानी आणि मनस्ताप टळू शकतो ! |