१. हिंदु युवती २ वर्षांपूर्वी मुसलमान युवकासमवेत पळून जाणे, काही दिवसांनी ती माहेरी परतल्यावर तिच्या पालकांनी युवकाच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट करणे आणि त्यानंतर युवतीने पुन्हा पळून जाऊन पालकांनी खोटी तक्रार दिली असल्याचे पोलिसांना सांगणे
एका जिल्ह्यामध्ये एक युवती (वय १८ वर्षे) २ वर्षांपूर्वी २९ वर्षांच्या मुसलमान युवकासमवेत पळून गेली. तिच्या आई-वडिलांनी तिला परत आणण्याचे प्रयत्न केले; परंतु ती परत आली नाही. काही दिवसांनंतर ती पालकांकडे परतल्यावर तिने गोड बोलून सांगितले, ‘‘मी आता मुसलमान युवकाकडे परत जाणार नाही.’’ यामुळे पालकही त्या भ्रमात राहिले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, ‘आमच्या मुलीला मुसलमानाने बळजोरीने पळवून नेले आहे. तेथे तिला त्रास होत आहे.’ प्रत्यक्षात घरी आलेली युवती काही दिवसांतच पुन्हा पळून गेली आणि तिने पोलीस ठाण्यात जबाब दिला, ‘मला काहीही त्रास होत नसून माझ्या पालकांनीच खोटी तक्रार दिली आहे.’ तिचा हा जबाब पोलिसांनी ‘व्हिडिओ रेकॉर्डिंग’ करून घेतला.
२. भावनाशील असणार्या हिंदु पालकांनी युवतीची सुरक्षेच्या दृष्टीने काळजी न घेणे
ही युवती डिसेंबर २०२१ मध्ये तिच्या पालकांकडे परतली. त्या वेळी काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तिच्या कुटुंबाला साहाय्य करायचे ठरवले. हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी युवतीच्या सुरक्षेविषयी तिच्या वडिलांना मार्गदर्शनही केले; परंतु भावनाशील असलेल्या हिंदु पालकांनी युवतीच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली नाही. या संपूर्ण घटनाक्रमात जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
२ अ. युवतीला पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे देणे : युवती मुसलमानाकडे असतांना बुरखा घालायची. ती आई-वडिलांकडे परत आल्यावर त्यांनी तिला पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे घेऊन दिले. तिने अंगभर कपडे घालावेत, याविषयी पालकांची उदासीनता होती.
२ आ. आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे गांभीर्य अल्प असणे : प्रारंभी मुलगी गेल्यानंतर मुलीच्या आईने नामजपादी उपाय आणि साधना चालू ठेवली. परिणामी ती मुलगी २५ दिवसांनी परतही आली होती. पालकांना सांगण्यात आलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांविषयी त्यांचा दृष्टीकोन सामान्य होता. त्यांचे त्याविषयीचे गांभीर्यही अल्प होते.
२ इ. हिंदुत्वनिष्ठांनी विचारूनही दृष्ट काढल्यानंतर नारळाविषयीची माहिती त्यांना न देणे : युवतीची नारळाने दृष्ट काढून झाल्यावर ‘नारळ कसा फुटला’, हे हिंदुत्वनिष्ठांनी पालकांना कळवायला सांगितले होते; मात्र त्यांनी २ दिवस याविषयी काहीच कळवले नाही. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी विचारल्यावर पालकांनी ‘काही विशेष झाले नाही’, असे सांगितले. पुन्हा त्याविषयी पाठपुरावा घेतल्यावर लक्षात आले की, नारळ नीट फुटला होता. त्याच्या कवचाचे तुकडेही झाले होते.
२ ई. युवतीने सासरहून आणलेल्या वस्तू तिच्या पालकांनी ५ दिवस घरातच ठेवणे : युवतीने सासरहून आणलेल्या सर्व वस्तू आम्ही नष्ट करायला सांगितल्यानंतरही पुढील ५ दिवस या वस्तू पालकांनी घरात तशाच ठेवल्या होत्या.
२ उ. युवतीने पालकांच्या भावनिकतेचा अपलाभ घेऊन तसे बोलणे, तिच्या बोलण्याला भुलून पालकांनी तिला गाडीची चावी देणे आणि ती पुन्हा पळून जाणे : कार्यकर्त्यांनी पालकांना कायदेशीर कारवाई, तसेच मुलीला एकटे न सोडणे याविषयी मार्गदर्शन केले होते. युवतीने पालकांना सांगितले, ‘‘मला मुलाकडेही बंधनात ठेवतात आणि इकडे (माहेरी) आल्यावर तुम्हीही तसेच ठेवता. मोबाईल (भ्रमणभाष) हाताळू शकत नाही.’’ हे ऐकल्यावर भावनिक झालेल्या तिच्या पालकांनी तिला गाडीची किल्ली दिली. यानंतर ती गाडी घेऊन निघून गेली. तेव्हापासून तिचा पत्ताच लागत नाही. तिचा भ्रमणभाषही बंद आहे. त्यामुळे तिच्याविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
३. हिंदु युवतीच्या पालकांच्या संदर्भात लक्षात आलेली सूत्रे
अ. ‘जिहाद’ हे धर्मयुद्ध आहे’, याची पालकांना जाणीवच नव्हती. ‘हे सर्व मानसिक आहे’, या विचारामुळे पालकांनी तिला सतत सवलत दिली.
आ. पालकांनी शक्तीपात योगानुसार दीक्षा घेतली होती. त्यानुसारही त्यांना काही मार्गदर्शन करण्यात आले होते; पण आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे आणि देवतांचे साहाय्य घेणे यासंदर्भात त्यांची उदासीनता होती.
इ. युवतीला भावनिक स्तरावर हाताळण्यात आले. याचा तिने अपलाभ करून घेतला. ती थोडे दिवस बंधनात राहिली असती, तर त्यातच तिचे भले होते; मात्र याची जाणीव पालकांना नव्हती. तथाकथित सुशिक्षितपणा आणि धर्माचे पालन यांमध्ये त्यांनी स्वतःच्या विचारांचा गोंधळ करून घेतला होता. वैचारिकदृष्ट्या गोंधळात सापडलेल्या पालकांचे उदाहरण या प्रसंगातून अनुभवायला आले.
ई. सर्व गोष्टींचे गांभीर्य ठाऊक असूनही युवतीची आई मुसलमान युवकाशी भ्रमणभाषवर बोलायची.’
– एक धर्मप्रेमी महिला (६.५.२०२२)