माझी अटक ही मुख्यमंत्री विजयन् यांच्याकडून जिहाद्यांना रमझानची दिलेली भेट ! – माजी आमदार पी.सी. जॉर्ज

थिरूवनंतपूरम् (केरळ) – मला करण्यात आलेली अटक ही मुख्यमंत्री विजयन् पिनराई यांनी रमझाननिमित्त आतंकवादी मुसलमानांना  दिलेली भेट आहे, अशी टीका माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी नेते पी.सी. जॉर्ज यांनी केली. जॉर्ज यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कथित आक्षेपार्ह विधान केल्यावरून जॉर्ज यांना अटक करण्यात आली होती.

मी माझ्या विधानावर ठाम ! – जॉर्ज

जार्ज पुढे म्हणाले की, मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, मी माझ्या विधानावर अद्यापही ठाम आहे. जर मी काही चुकीचे बोललो असेल, तर मी ते मागे घेऊन क्षमा मागण्यासही मागे राहिलेलो नाही. माझे भाषण हिंदु महासंमेलनाच्या ठिकाणी केले होते. मी तेथे हेच म्हटले होते की, मला मुसलमान कट्टरतावाद्यांच्या मतांची आवश्यकता नाही. जो भारतावर प्रेम करत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीची, मग ती ख्रिस्ती, मुसलमान अथवा हिंदू असो, त्यांची मते मला नकोत आहेत. असे विधान केल्यामुळे मी धर्मांध कसा ठरू शकतोे ?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले होते पी.सी. जॉर्ज ?

पी.सी. जॉर्ज हिंदु महासंमेलनात भाषण करतांना म्हणाले होते, ‘मुसलमानांच्या उपाहारगृहांमध्ये हिंदूंना नपुंसक बनवण्याचा प्रयत्न केला जातो. तेथे चहासारख्या पेयांमध्ये औषध टाकले जाते, त्यामुळे व्यक्ती नपुंसक बनते. अशा उपाहारगृहांवर बहिष्कार घातला पाहिजे. मुसलमान अन्य धर्मियांना नपुंसक बनवून देशावर नियंत्रण मिळवू पहात आहेत, तर दुसरीकडे ते स्वतःची लोकसंख्या वाढवत आहेत.’ या विधानामुळे जॉर्ज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती.