हिंदूंच्या सर्व समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच उपाय ! – विश्वनाथ कुलकर्णी, उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

रायबरेली (उत्तरप्रदेश) – स्वातंत्र्यानंतर भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यात न आल्याने राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती विदारक झाली आहे. भारतात लव्ह जिहाद, धर्मांतर, मंदिरांचे सरकारीकरण, मंदिरांतील भ्रष्टाचार अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा अनेक समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच उपाय आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी (६३ टक्के आध्यात्मिक पातळी) यांनी केले. येथील सलवन तालुक्यातील मिर्जापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे लक्ष्मणपुरीचे समन्वयक श्री. प्रशांत वैती यांनी ‘सध्याच्या काळात हिंदु संस्कृतीचे पालन आणि धर्माचरण केल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते’, असे सांगितले.

श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी

क्षणचित्रे

१. ही सभा बहुसंख्येने अन्य पंथीय असलेल्या क्षेत्रात घेण्यात आली. येथे हिंदूंवर पुष्कळ अत्याचार झाले आहेत. अन्य क्षेत्रातील हिंदूंना एकत्रित करून येथे सभा घेण्यात आली.

२. येथे सर्वानुमते प्रत्येक शनिवारी धर्मशिक्षणवर्ग घेण्याचे निश्चित करण्यात आले.