नोएडा (उत्तरप्रदेश) – शहरात कुत्र्यांच्या छत्र्यांप्रमाणे ठिकठिकाणी अवैध मजारांची (मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकिर यांची थडगी असलेले ठिकाण ) निर्मिती केली जात आहे. प्रशासनाने त्यांच्यावर त्वरित कारवाई केली नाही, तर विश्व हिंदु परिषद आंदोलन करील, अशी चेतावणी विहिंपकडून देण्यात आली आहे. गौतमबुद्धनगरचे जिल्हाधिकारी आणि नोएडा प्राधिकारण यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. विहिपचे प्रांतमंत्री डॉ. राजकमल गुप्ता यांनी सांगितले की, या मजारांमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. यामुळेच त्यांची संख्या वाढत आहे.
VHP का ऐलान- नोएडा में अवैध मजार और फर्जी केस नहीं हटाए गए तो पूरे प्रदेश में होगा प्रदर्शन
https://t.co/e6EHfm50PQ
#noida— News18 Noida (@News18Noida) May 1, 2022
डॉ. गुप्ता यांनी आरोप केला की, आम्ही जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन परतत असतांना आमच्या कार्यकर्त्यांवर आक्रमण करण्याचा प्रयत्नही झाला. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे नोंदवरून अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलीस ठाण्याच्या समोर पोलिसांकडून कार्यकर्त्यांवर पिस्तुल रोखून त्यांना ठार मारण्याचीही धमकी देण्यात आली. अशा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. (या आरोपांमध्ये तथ्य असेल, तर प्रथम अशा पोलिसांवर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअवैध मजार हटवण्याची मागणी का करावी लागते ? नोएडाचे प्रशासन झोपले आहे का ? |