शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक जीवनसत्त्व आवश्यक आहे; पण ‘व्हिटॅमिन-डी’चे स्वत:चे महत्त्व आहे. व्हिटॅमिन-डी शरिरासह मेंदूसाठीही पुष्कळ उपयुक्त आहे. व्हिटॅमिन-डीच्या न्यूनतेमुळे हाडांचा भुसा होतो. पुरुषांना टक्कल पडण्याची समस्या व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे निर्माण होऊ शकते. शरिरात व्हिटॅमिन-डीच्या अभावाची लक्षणे कोणती आहेत आणि कुठले पदार्थ खाल्ल्याने त्याची पूर्तता होऊ शकते, याविषयी जाणून घेऊया.
व्हिटॅमिन-डीच्या अभावाची लक्षणे
१. पुरुष किंवा स्त्रिया यांच्यात केस गळायला लागणे आणि टक्कल पडणे.
२. अशक्तपणा आणि थकवा येणे.
३. जखम बरी होण्यास वेळ लागणे.
४. हाडांची घनता अल्प होणे आणि त्यामध्ये छिद्रे पडणे.
५. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे संसर्गजंतू आणि बॅक्टेरिया यांचे संक्रमण होऊ शकते.
६. स्नायूंमध्ये वेदना होणे.
७. चिंता आणि नैराश्य यांची समस्या होऊ शकते.
८. पाठदुखी आणि हाडेदुखीची समस्या निर्माण होणे.
‘व्हिटॅमिन-डी’ची न्यूनता भरून काढण्यासाठी कोणते पदार्थ खावेत ?
व्हिटॅमिन-डी मिळवण्याचा सर्वाेत्तम मार्ग म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सूर्यप्रकाश घेणे. तसेच व्हिटॅमिन-डीने समृद्ध असलेले संत्र, गायीचे दूध, मशरूम (अळंबी), कॉड लिव्हर ऑईल, अंड्याचा पिवळा भाग आणि सॅलमन मासे यांचे सेवन करावे.
(साभार : ‘झी न्युज’ संकेतस्थळ)