परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले डिचोली (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) मंगेश मांद्रेकर !

७.५.२०२१ या दिवशी डिचोली (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे मंगेश मांद्रेकर (वय ७५ वर्षे) यांचे निधन झाले. चैत्र कृष्ण एकादशी (२६.४.२०२२) या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी श्रीमती मनीषा मंगेश मांद्रेकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

(कै.) मंगेश मांद्रेकर

१. सहनशीलता

‘माझे पती मंगेश मांद्रेकर यांना कितीही शारीरिक त्रास झाला, तरी ते सहन करायचे. ते म्हणायचे, ‘‘गुरुदेवांनाच माझी काळजी आहे आणि तेच मला यातून सुखरूप बाहेर काढतील.’’ एकदा ते पाय घसरून पडले. तेव्हा त्यांच्या मनगटाच्या हाडाला चीर पडली होती. त्या वेळी त्यांचा हात ‘प्लास्टर’मध्ये ठेवला होता. तेव्हा त्यांना पुष्कळ वेदना होत होत्या; परंतु ‘गुरुदेवच मला सहन करण्याची शक्ती देत आहेत’, असा त्यांचा भाव होता.

श्रीमती मनीषा मांद्रेकर

२. प्रत्येक कृती वेळेत करणे

ते प्रतिदिन पहाटे ५ वाजता उठून एक घंटा पायी चालण्याचा व्यायाम करत असत. ते सर्व कृती वेळेवर करत असत. ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरणही ठरलेल्या वेळेतच करायचे.

३. त्यांच्या मनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत साधनेचेच विचार असायचे.

४. भाव

अ. ‘परात्पर गुरु डॉक्टर सतत समवेत आहेत’, असा त्यांचा भाव होता. ते सतत परात्पर गुरु डॉक्टरांशी सूक्ष्मातून बोलत असत. ते त्यांच्या मनातील प्रत्येक गोष्ट परात्पर गुरु डॉक्टरांना सांगत असत.

आ. ते देवपूजा भावपूर्ण करत असत. त्यांनी केलेली देवपूजा पाहून आमचा भाव जागृत होत असे.

– श्रीमती मनीषा मंगेश मांद्रेकर (पत्नी, वय ६३ वर्षे), डिचोली, गोवा. (१२.४.२०२२)