आनंद मिळाला ध्यानमग्न कृष्ण दर्शनात ।

कृष्णचिंतनाने व्यापून टाकले तन आणि मन ।

कृष्णप्रीती अन् कृष्णकृपा यांत जातो क्षणन्क्षण ॥ १ ॥

पुष्पांजली पाटणकर

अशाच एका दुपारी क्षणभर होते झोपेत ।

आनंद मिळाला ध्यानमग्न कृष्ण दर्शनात ॥ २ ॥

तरूखाली बैसला होता कृष्ण ध्यानमग्न ।

मावळत्या सूर्यकिरणांतील मूर्ती पाहून हरपले देहभान ॥ ३ ॥

वाटले या चरणी चार पुष्पे वहावीत ।

तरूवरची चार पुष्पे घेतली आेंजळीत ॥ ४ ॥

फुले घेऊन आले, तर शेषाने धरली मस्तकावर सावली ।

मागे सरले, मी मागे सरले त्याच पावली ॥ ५ ॥

हृदयांत साठवत होते, ही नयनमनोहर मूर्ती ।

त्याच्या चरणस्पर्शाने धन्य झाली धरती ॥ ६ ॥

दोन्ही हात जोडून त्याला केले मी नमन ।

आेंजळीतील फुले धरतीवर पडली न राहिले मन ॥ ७ ॥

अशा सुंदर अनुभूती सांगू आम्ही कशा कुणा ।

सांग ना देवा, ऐकणार कोण तुझ्याविना ॥ ८ ॥

या शब्द फुलांच्या सौरभाने दरवळू दे आसमंत ।

हा आनंद सुधा चाखण्या भ्रमर रूपे यावेत देव नि संत ॥ ९ ॥

– कृष्णपुष्प (पुष्पांजली, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), बेळगाव (१८.२.२०२२)