श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांचे आवाहन
बागलकोटे (कर्नाटक) – ‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे. कर्नाटकातील आणि प्रामुख्याने राज्यात असलेल्या केरळच्या धर्मांधांच्या दागिन्यांच्या दुकानातून सोने खरेदी करू नका, असे आवाहन श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी केले आहे.
Right-wing groups in Karnataka have been urging Hindus not to purchase gold from shops run by Muslims in the state.#Karnataka https://t.co/VDOBR2WbwJ
— TIMES NOW (@TimesNow) April 25, 2022
श्री. मुतालिक म्हणाले की, हलालविरोधी अभियानाच्या माध्यमातून जागृती करण्याचे काम यशस्वी झाले आहे. आता अक्षय्य तृतीयेच्या संदर्भात हे अभियान आहे.
(सौजन्य : TIMES NOW)
राज्यात मूलतः केरळच्या असलेल्या धर्मांधांची सोन्याच्या दागिन्यांची दुकाने आहेत. हिंदूंनी तिथे सोने खरेदी करू नये. केरळ येथे ८०० हिंदूंची हत्या झाली आहे. तुम्ही तेथे खरेदी केल्यास त्याचा लाभ केरळच्या जिहादी संघटनांना होतो. केरळमध्ये १२ सहस्र मुलींना बाटवून मुसलमान करण्यात आले आहे. तुम्ही धर्मांधांच्या दुकानात सोने खरेदी केले, तर ते सर्व पैसे आपल्याविरोधातच वापरल्यासारखे होईल. त्यासाठी अक्षय्य तृतीयेला हिंदु सोनारांकडे सोने खरेदी करा !
(म्हणे) ‘बुलडोझरद्वारे प्रथम श्रीराम सेनेला उखडून टाकले पाहिजे !’ – काँग्रेस नेते सिद्धरामय्या
‘बुलडोझरद्वारे प्रथम श्रीराम सेनेला उखडून टाकले पाहिजे’, असे मत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना श्री. मुतालिक म्हणाले की, सिद्धरामय्या हे निराशेमुळे असे वक्तव्य करत आहेत, असे वाटते; कारण राजस्थानात असलेल्या काँग्रेस शासनाने तेथील ३०० वर्षे जुने मंदिर पाडून टाकले आहे.
(सौजन्य : Tv9 Kannada)
तेथील मुख्यमंत्र्यांनी चूक स्वीकारून ‘मंदिर पुन्हा बांधतो’, असे सांगितले आहे. अनेक गरीब हिंदूंची घरे पाडण्यात आली आहेत. याविषयी सिद्धरामय्या यांचे काय म्हणणे आहे ? असा प्रश्न श्री. मुतालिक यांनी उपस्थित केला.
संपादकीय भूमिका
|